सर्व कालबाह्य, धोकादायक पूल पाडणार; उपमुख्यमंत्री अजित पवार,कुंडमळा येथील दुर्घटनास्थळी भेट…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
तळेगाव दाभाडे :- “कुंडमळा येथील अपघातग्रत पुलाचा उर्वरित सर्व भाग पाडण्यात येईल. याशिवाय कालबाह्य झालेले तसेच स्ट्रक्चरल ऑडिटर्स यांनी वापरण्यास धोकादायक असा शेरा दिलेले इतरही सर्व धोकादायक पूल पाडण्यात येतील”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
तसेच कुंडमळा येथील पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यानंतर तातडीने सुरुवात करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तसेच दुर्घटनेतील जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ”मावळ तालुक्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे येथे पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने बचाव कार्यासाठी अत्याधुनिक वाहन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल.
दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता आदींसह निवासी उपजिल्हाधिकारी यांची समिती नेमली आहे.”
नवीन पुलाला दर्शक गॅलरी
कुंडमळा येथे साडेसात मीटर रुंदीचा पूल बांधण्यात येणार असून त्याच्या दोन्ही बाजूला आठ फुटांचे दोन पदपथ करण्यात येणार आहे. तसेच हे पर्यटनस्थळ असल्याने दोन दर्शक गॅलरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..