अहमदाबाद विमान अपघात ; मृतांच्या कुटुंबियांना टाटा ग्रुप कडून प्रत्येकी 1 कोटींची मदत जाहीर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अहमदाबाद :- “गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात 12 जून गुरुवारी दुपारी 1.30 च्या सुमारास एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले असून या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचा दावा असोसिएडेट प्रेस या संस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने केला आहे.
या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना टाटा ग्रुप कडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना टाटा ग्रुप कडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.त्याचबरोबर आम्ही जखमींच्या उपचाराची देखील जबाबदारी घेत आहोत. असे देखील टाटा ग्रुप कडून सांगण्यात आला आहे. तर दुसरीकडे या विमान अपघातामध्ये नुकसान ग्रस्त झालेल्या बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलची पुनर्निर्मिती करण्यासाठी मदत केली जाणार असल्याचं देखील टाटा ग्रुप कडून सांगण्यात आलं आहे.
विमान अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, परंतु त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना वाचवणे खूप कठीण असल्याची माहिती आयुक्त मलिक यांनी असोसिएडेट प्रेसला दिली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे, परंतु ढिगारा आणि आगीची स्थिती पाहता परिस्थिती खूप आव्हानात्मक आहे. असं देखील आयुक्त मलिक म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..