अजितदादांकडून निधी वाटपात दुजाभाव, मंत्री देसाईंचं सूचक विधान; म्हणाले, “आता मी..”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मी आमदारांशी चर्चा करणार आहे. कुठेही दुजाभाव होणार नाही. सर्व आमदारांना त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात कामांसाठी निधी मिळावा यासाठी मी स्वतः अर्थमंत्री अजित पवारांकडे याबाबत पाठपुरावा करेल अशी ग्वाही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
शिवसेनेच्या मेळाव्यानिमित्त मंत्री देसाई नगर शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना निधी वाटपात कोणताही दुजाभाव होणार नाही, असे स्पष्ट केले.
अहिल्यानगर येथे शिवसेनेच्या मेळाव्याला मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. तसेच अजित पवार गटाकडून निधी वाटपाबाबत दुजाभाव केला जातो यावर शिवसेनेचे आमदार नाराज आहे यावर देखील मंत्री देसाई यांनी भाष्य केले. देसाई म्हणाले, याबाबत मी आमदारांशी चर्चा करणार आहे. कुठेही दुजाभाव होणार नाही. सर्व आमदारांना त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात कामांसाठी निधी मिळावा यासाठी मी स्वतः अर्थमंत्री अजित पवारांकडे याबाबत पाठपुरावा करेल अशी ग्वाही देतो असं त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाली असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगासह भाजप नेत्यांनी त्यांन प्रत्युत्तर दिलं आहेच. आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनीही राहुल गांधींना जोरदार उत्तर दिलं आहे. काँग्रेसचं सरकार ज्या ठिकाणी आलं त्या ठिकाणी मॅच फिक्सिंग झाली नाही का? काँग्रेसच्या विरोधात निकाल गेला की मॅच फिक्सिंग आणि यांच्या बाजूने निकाल लागला की ईव्हीएम मशीन व्यवस्थित. त्यांना सोयीस्कर असेल अशा प्रकारचे त्यांचे भाष्य असतात, अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली.
नगरच्या पर्यटनासाठी प्रयत्न करणार
शहरातील पर्यटनाबाबत आमचे विधिमंडळातील सहकारी व नगर जिल्ह्याचे चारही जिल्हाप्रमुख यांनी मला याबाबत कल्पना दिली आहे. नगर शहरात पालिकेच्या एका जागेवरती पिकनिक स्पॉट होऊ शकतो तसेच भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणासंदर्भात देखील मला आमच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. नगर विकास खाते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. यांच्या नेतृत्वाखाली आम्ही याबाबत एक बैठक घेऊ. संबंधित जागा जर आपल्याला उपलब्ध होत असेल तर पर्यटन मंत्री म्हणून मी नक्कीच त्याच्या विकासासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकू अशी ग्वाही यावेळी मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..