उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या कामगिरीच्या प्रगतीपुस्तकात शिंदे गटाचे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड नापास झाले आहेत. यावरून राठोड यांनी आज बंजारा समाजाच्या मेळाव्यात जोरदार टोलेबाजी केली असून उद्धव ठाकरेंचे मला आजही फोन येतात, असा गौप्यस्फोट केला आहे.
प्रगतीपुस्तकात संजय राठोड नापास असल्याच्या शेऱ्यावरून राठोड यांनी एकनाथ शिंदेंना मी तुम्हालाच नापास करेन असा इशाराही दिल्याचे म्हटले आहे. संजय राठोड कधीही नापास होऊ शकत नाही. प्रगती पुस्तकात नापास केले, अरे मी कधी परीक्षाच दिली नाही, कुणी पेपरही तपासले नाहीत मग मी नापास कसा झालो? असा सवालही राठोड यांनी उपस्थित केला.
राठोड ठाकरे सरकारमध्ये मंत्री असताना पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणात त्यांचे नाव आले होते. यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. नंतर एकनाथ शिंदेंनी ठाकरेंपासून शिवसेना वेगळी केल्यानंतर राठोड यांना ही गोष्ट सलत असल्याने त्यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. फडणवीस सरकारमध्ये राठोड यांना मंत्रिपद मिळाले होते. त्याच उद्धव ठाकरेंचे आपल्याला फोन येत असतात, असा गौप्यस्फोट राठोड यांनी केला आहे.
ही सभा झाल्यानंतर बाहेर पडताना पत्रकारांनी याबाबत विचारल्यानंतर राठोड यांनी आपण तसे बोललोच नाही असा पवित्रा घेतला. नंतर घुमजाव करत स्पष्टीकरण देताना त्यांनी वरच्या पातळीवर सर्व नेते एकत्र असतात यामुळे कार्यकर्त्यांनी देखील मतभेद असले तरी मनभेद विसरून आपापल्या पक्षाचे स्थानिक पातळीवर काम करावे आणि एकत्र रहावे असे मला सांगायचे होते. ते मी सांगितले असे राठोड यांनी म्हटले. परंतू, त्यांनी उद्धव ठाकरे आपल्याला फोन करतात हे बोलल्याबाबत अवाक्षरही काढले नाही. या मेळाव्याला समाजाचे सर्वपक्षीय लोक आले होते. तिथे मला मंत्री म्हणून बोलावण्यात आले होते. त्यामुळे मी तिकडे गेलो होतो, असे ते म्हणाले. एकंदरीतच राठोड या प्रगतीपुस्तकात नापास झाल्यावरून नाराज असल्याचे बोलले जात आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..