‘टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा अन् गावागावात यात्रा काढा’, महायुती सरकारवर राऊत बरसले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने बिथरून भारत आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला चढवला. त्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत युद्धबंदीची घोषणा केली.
व्हाईट हाऊसमधून झालेल्या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर टीकेची तोफ डागली. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सरकारवर निशाणा साधला. महायुतीने डोनाल्ड यात्रा काढावी, असा खोचक सल्ला त्यांनी दिला.
डोनाल्ड यात्रा काढा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले,
“तिरंगा यात्रा काढली जातेय, पण यामागे नेमकं कारण काय? विजय कसला? माघार घेण्याचा? शस्त्रसंधीचं? युद्धविरामाचं? हे विजय मानून जर उत्सव साजरा होणार असेल, तर मग त्याचं श्रेयही ट्रम्पलाच दिलं पाहिजे. त्यामुळे गावागावात ‘डोनाल्ड यात्रा’ काढा, ‘डोनाल्ड जत्रा’ भरवा आणि ट्रम्प यांचा पुतळा उभा करा. त्यावर अमेरिकेचा झेंडा फडकवा आणि म्हणा, आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे”, असा खोचक सल्ला त्यांनी दिला.
डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा उभा करा
तसेच ‘टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा उभा करा आणि त्यावर अमेरिकेचा झेंडा फडकवा. कारण, तुम्हाला युद्धबंदीचं विजय ट्रम्पमुळेच मिळालंय ना’, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
एकनाथ शिंदेंवर घणाघात
एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागत राऊत म्हणाले,’आज इतकं सोपं झालंय का की आमदार-खासदार विकत घ्या, आणि सरकार बनवा? निवडणूक आयोगाच्या बोटाला धरून पक्ष ताब्यात घेणं इतकं सोपं नाही’, असा घणाघात संजय राऊतांनी केला.
पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी राजीनामा द्यावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, ‘बलुचिस्तान स्वतंत्र व्हावं म्हणून भारताने मदत करावी, अशी गरज होती. पण तेवढंही केलं नाही. मिस्टर मोदी आणि अमित शहा, तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, आणि तो दिवस लवकरच येईल’, असा दावा संजय राऊत यांनी केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..