उत्तरकाशीतील गंगनीजवळ हेलिकॉप्टर कोसळले, 6 जणांचा मृत्यू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उत्तरकाशी :- “उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. आज सकाळी 9 वाजता गंगनाईजवळ एक हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेतील हेलिकॉप्टरच्या अवशेषांचे फोटो समोर आले आहेत. हे हेलिकॉप्टर एका खाजगी कंपनीचे असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर स्थानिक लोक आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु आहेत.
गंगनाईजवळ हेलिकॉप्टर कोसळले
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात गंगनाईजवळ मोठा अपघात झाला. गंगोत्री धामकडे जाणारे एरो ट्रान्स खाजगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. हा अपघात गंगनाईच्या पुढे, नाग मंदिराच्या नजिक भागीरथी नदीजवळ घडला आहे. प्राथमिक माहितीनुसार हे हेलिकॉप्टर गंगोत्री धामच्या यात्रेला गेलेल्या भाविकांना घेऊन जात होते.
मदत आणि बचावकार्याला सुरुवात
या घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि मदत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिस, विशेष लष्करी तुकडी, आपत्ती व्यवस्थापन क्यूआरटी टीम, एनडीआरएफ, एसडीआरएफ, रुग्णवाहिका सेवा आणि महसूल विभागाची अनेक पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
मुख्यमंत्री धामी यांनी मृतांना वाहिली श्रद्धांजली
या घटनेनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटले की, “उत्तरकाशीतील गंगणीजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात काही लोकांच्या मृत्यूची अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्यांना देव शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबांना हे मोठे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आणि अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. मी अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहे आणि प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.”

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..