तहसीलदार निघुन गेल्याने तहसील कार्यालय रामभरोसे ; तहसीलदार हजर नसल्याने शेतकरी , विद्यार्थी, नागरिकांची कामे खोळंबली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
निलेश नरवाडे
महागाव :- महागाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार अचानक निघुन गेल्याने मागील तीन दिवसांपासून तहसील कार्यालयाचा प्रभार कोणाकडेच दिला नसल्याने तहसील कार्यालय वाऱ्यावर सोडल्या सारखे झाले असुन तहसीलदाराविना विद्यार्थी,शेतकरी,नागरिकांची कामे खोळंबली आहेत.
महागाव तालुक्यात गौण खनिज तस्करीचा मुद्दा चांगलाच गाजत असताना त्यांना पाठीशी घालणारे तहसीलदार यांच्या कार्यशैलीवर नागरिक रोखठोक पणे प्रश्न चिन्ह उपस्थित करून कारवाईची मागणी करू लागले आहेत.
आपल्या कारभारविरोधात जन आक्रोश जनतेत उफाळून येत असलेला पाहता तहसीलदार यांनी सुट्टीचा अर्ज टाकून काढता पाय घेतला परंतु त्याचा अर्ज मंजुर झाला की नाही याबाबत जनता अनभिज्ञ आहे .
तहसीलदार जावून तीन दिवस झाले असुन जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी यांनी अद्याप त्यांच्या पदाचा प्रभार कोणत्याच अधिकाऱ्यांकडे दिला नसल्याने मागील तीन दिवसांपासून तहसील कार्यालय तहसीलदारांविना असल्याने वाऱ्यावर सोडल्या सारखे आहे.
सद्या खरीप हंगाम ची तैयारी शेतकरी विविध कमा साठी व शैक्षणिक सत्र सुरू असल्याने विविध कागदपत्रे काढण्यासाठी विद्यार्थी,पालक,शेतकरी ,नागरिकांची गर्दी तहसील कार्यालयात पहावयास मिळत आहे.परंतु आपल्या प्रमाणपत्र,कागद पत्रांवर स्वाक्षऱ्या करण्यास तहसीलदार हजर नसल्याने त्यांना मानसिक ,आर्थिक त्रास विनाकारण सहन करावा लागत आहे.त्यामुळे तहसील कार्यालय तहसीलदारांविना किती दिवस राहणार जिल्हाधिकारी यांनी या बाबीची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..