जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला; ३ जवानांचा मृत्यू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रामबन :- “जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा येथे लष्कराचा ट्रक सुमारे २००-३०० मीटर दरीत कोसळल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला. अमित कुमार, सुजीत कुमार आणि मान बहादूर अशी मृत जवानांची नावे आहेत.
रविवारी जम्मूहून श्रीनगरला लष्काराचा ताफा जात असताना ही घटना घडली.
रविवारी रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागात लष्कराचा ट्रक रस्त्यावरून घसरल्याने भीषण अपघात झाला. ट्रक खोल दरीत कोसळल्याने तीन जवानांना आपला जीव गमवावा लागला. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून बचाव कार्य करण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनांशी संबंधित ही सहा महिन्यांतील तिसरी घटना आहे. यापूर्वी, ४ जानेवारी रोजी बांदीपोरा जिल्ह्यातील एसके पायीन भागात सहा जवानांना घेऊन जाणारा लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याने चार जवानांचा मृत्यू झाला होता आणि दोन गंभीर जखमी झाले होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..