काँग्रेसचं अधिवेशन बोलवा आणि मोदींच्या अभिनंदनाचा ठराव घ्या, बावनकुळेंची मागणी, म्हणाले, नेहरु गांधींनी लोकांचा विचार केला नाही….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “आता जातीनिहाय जनगणना होणार आहे. 1948 नंतर काँग्रेसने लोकांना…बनवलं. इंदिरा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी लोकांचा विचार केला नाही, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
2027 पर्यंत जनगनणा होणार आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणत होते की जनगणना केव्हा होणार? पण त्यांनी 65 वर्ष काय केलं? तुम्ही जनगणना केली नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली. काँग्रेसचं अधिवेशन बोलवा आणि मोदींच्या अभिनंदनाचा ठराव घ्या, असेही बावनकुळे म्हणाले.
काँग्रेसचं अधिवेशन बोलवा आणि मोदींच्या अभिनंदनाचा ठराव घ्या
जातीनिहाय जनगणनेसाठी राहुल गांधी यांना जर मोदींचं अभिनंदन करायचं असेल तर काँग्रेसचे अधिवेशन बोलवा आणि त्यात अभिनंदनाचा ठराव घ्यावा असे बावनकुळे म्हणाले. जनगणनेच्या निर्णयाचे अभिनंदन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेतला की महाराष्ट्रातील 1 लाख 186 बूथ वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिनंदनाचा ठराव घेणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. तर येणाऱ्या ग्रामसभेत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा अभिनंदनचा ठराव घेतला जाणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.
राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीमध्ये महिला निवडणूक लढवणार
राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीमध्ये महिला निवडणूक लढवणार आहेत. देशात 200 च्या वर महिला खासदार होणार आहेत असे बावनकुळे म्हणाले. आरोप प्रत्यारोप आणि नौटंकी वेगळी असते, पण मतदारसंघाच्या समस्या मांडण्यासाठी वकील म्हणून प्रवीण तायडे काम करत आहेत. मी अमरावतीच्या आचलपूर विधानसभेच्या जनतेच्या पाया पडतो, नतमस्तक होतो तुम्ही नरेंद्र मोदी यांचे ऐकले असे बावनकुळे म्हणाले. 15 दिवसात अचलपूर येथील बंद पडलेल्या फिनले मिलच्या संदर्भात मिटिंग लावेल. आता अचलपूरच्या विकासाच्या गाडीच्या मधात कोणीही आलं तर अँक्सिडेंट होणार आहे असे बावनकुळे म्हणाले. मंत्रालयात तिजोरी खाली करण्यासाठी डाकू म्हणून प्रवीण तायडे यांचं नाव येईल. पण मला अभिमान आहे प्रवीण तायडे यांचा असे बावनुकळे म्हणाले. पुढच्या निवडणुकीत जेव्हा प्रवीण तायडे फॉर्म भरेल तेव्हा इथले विरोधक दुसरा मतदार संघ शोधतील असेही बावनकुळे म्हणाले.