हिंदीला विरोध मग इंग्रजीला का नाही? CM देवेंद्र फडणवीस यांची विचारणा; ‘महाराष्ट्रात दुसरी…’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्रात आता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला विरोध होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाला जाहीर विरोध केला असून, विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही आव्हान दिलं आहे.
दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर प्रतिक्रिया दिली असून, इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हा कोणता विचार आहे अशी विचारणा केली आहे.
“महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे, सर्वांनी ती शिकलीच पाहिजे. पण त्याच्यासोबत दुसरी एखादी भाषा शिकायची असेल तर ती भाषा शिकता येतो. मला तर आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध मग इंग्रजीला का नाही. इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हा कोणता विचार आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी मराठीला कोणी विरोध केला तर सहन करणार नाही हेदेखील स्पष्ट केलं.
राज ठाकरेंविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार
राज ठाकरेंच्या भूमिकेला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला असून, शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. “ट्विट करुन राज ठाकरेंनी शाळा, पुस्तकालयं कशी टार्गेट करावी सांगितलं आहे. हे विदारक आहे. एक भाषा अधिक शिकायला मिळत असताना स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्योत्तर काळात कोणताही राजकारणी कोणीही इतक्या तालिबानी पद्दतीनं वागला नसेल. राज ठाकरेंचं वर्तन दु:खद आहे. राज ठाकरेंना कायदा कळतो की नाही हे उपस्थित करणारं आहे. राज ठाकरेंनी धोरण न वाचता राजकीय पोळी भाजण्यासाठी चालवलेला हा एक प्रयत्न आहे”, असाही दावा त्यांनी केला आहे.
“ज्याप्रकारे राज ठाकरे यांचे कार्यकर्ते, बेकायदा मंडळी एकत्रित होऊन सार्वजनिकपणे शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या अख्त्यारित, शासनाच्या निर्णयाचं दहन केलं आहे ते चुकीचं, बेकायदा आणि असंवैधानिक आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी कायद्याचा भंग करत बॅनर लावले. भाषेवर आधारित लोकांना वर्गीकृत करणं, वाद निर्माण करणं हेतू आहे. हे जातीय तेढ निर्माण करण्याचंही कृत्य आहे. राज ठाकरेंवर एफआयआर दाखल केला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
अजित पवारांची भूमिका
“महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे. भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंदी भाषा वापरतात. काहीजण हिंदी राष्ट्रभाषा असल्याचं म्हणतात. पण त्यावरुन वाद असून, मला त्या वादात पडायचं नाही. ज्यांना काही उद्योग नाही, काम नाही ते असले वाद घालतात. आणि त्यातच वेळ घालवतात,” असा टोला अजित पवारांनी राज ठाकरेंना लगावला.
“इंग्रजी ही जगात बहुतेक अनेक देशात चालते. त्यामुळे ती भाषाही आली पाहिजे. तिन्ही भाषेला महत्त्व आहे. पण शेवटी आपली स्वत:च्या मातृभाषेला पहिल्या क्रमांकाचं स्थान आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान अजित पवारांच्या या विधानावर मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी अजित पवारांना जर हिंदी राष्ट्रभाषा वाटत असेल तर त्यांनी पहिलीपासून धडे घेतले पाहिजेत. त्यांना पुन्हा शाळेत पाठवलं पाहिजे असा टोला लगावला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..