‘…म्हणून सुधीर साळवींना पक्षाचं सचिवपद दिलंय’, उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांसमोर सांगितलं कारण….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदारकीची सीट सुधीर साळवींना दिली जाईल अशी शक्यता असताना अजय चौधरी यांना पुन्हा संधी देण्यात आली.
यानंतर दक्षिण मुंबईतल्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळाली होती.तेव्हा सुधीर साळवींचा योग्य सन्मान राखला जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले होते. सुधीर साळवींची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आलंय. यानंतर दक्षिण मुंबईतील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
उद्धव ठाकरेंकडून सुधीर साळवींना ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिवपद देण्यात आले. सचिवपदी बढती देण्यात आल्यानंतर सुधीर साळवी यांनी मातोश्री येथे उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत दक्षिण मुंबईतील पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना सचिवपद देण्याचे कारणही सांगितलं.
आपल लक्ष मुंबई महानगर पालिका यासाठी सुधीरला सचिव पद दिलंय अस उद्धव ठाकरे यांनी लालबाग-परळ येथील शिवसैनिकांना सांगितलं. सुधीर साळवी यांची शिवसेना सचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर लालबाग परळ येथील शिवसैनिक मातोश्रीवर आले होते. लालबाग परळ म्हणजे कट्टर शिवसैनिक असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
सुधीरवर मोठी जबाबदारी दिली आहे. तुम्ही लालबागकर आहात. सुधीर आता लालबागमधे राहिला तर मला सांगा. त्याला शिवसेनेचे सचिव पद दिल आहे. लालबाग परळ म्हणजे कट्टर शिवसैनिक आलाच, असे
ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी अशा कालपरवा बातम्या आल्या.आपल लक्ष आता मुंबई महानगर पालिका आहे. त्यासाठी सुधीरला सचिव पद दिलेलं आहे. सुधीरला मुंबईत पळवणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्रावर आलेलं संकट बाजूला टाकण्यासाठी असेच सर्वजण एकत्र आहात. असेच एकजुटीने राहा असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..