हाजी रफीक अहेमद लोहार न.प उर्दू शाळा क्रं २ मध्ये निरोप समारंभ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आज दिनांक ११/०४/२०२५ शनिवार रोजी हाजी रफीक अहेमद लोहार नगरपरिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ येथे वर्ग ७वी विद्यार्थींच्या निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.फारूक अहेमद होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प/न.प मुख्याध्यापक श्री.मो.मतीन सर , न.प शाळा क्रं १ चे मुख्याध्यापक मो.मुजाहीद सर व अब्दुल हमीद भाई पत्रकार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.हाजी मो.अलियार भाई,शेख शकील भाई, एजाज़ भाई टेलर हे उपस्थित होते. कार्यक्रमात लाभलेल्या अध्यक्ष सह सर्व प्रमुख अतिथी व प्रमुख पाहुणे यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराणाचे पाठन करून करण्यात आली त्यानंतर सुंदर अशी हम्मद व नात पाठन करण्यात आली त्यानंतर वर्ग ७वी विद्यार्थ्यांनी आप-आपले मनोगत व भाषण सादर केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मोहम्मद शारिक सर यांनी सादर केले तसेच वर्ग ७वी चे सर्व विद्यार्थ्यांना शाळे कडून भेटवस्तू म्हणून शाळेचे बॅक देण्यात आली तसेच शाळेचे मुख्याध्यापक मो.शारिक सर व शिक्षक वृंद व कार्यक्रमात आलेले संपूर्ण मुख्य अतिथी व प्रमुख पाहुणे यांनी निरोप घेणारे विद्यार्थींना पुढील शिक्षणासाठी शूभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन खान सादिक सर यांनी उत्कृष्टपणे पार पाडले तसेच आलेल्या पाहुण्यांचे सहभाग घेतलेले विद्यार्थी शिक्षक आभार शाळेचे मुख्याध्यापक यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वृंद वहीदा रहेमान बाजी व मुस्कान सदफ बाजी स्वयंपाकी ताहेरा बाजी तसेच शाळा यांनी परिश्रम घेतले

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..