आगडोंब…! विदर्भ मोठ्या संकटात; मध्य महाराष्ट्रावर अवकाळीची वक्रदृष्टी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच हवामानाची अनपेक्षित स्थिती महाराष्ट्रात पाहायला मिळाली. ज्यानंतर आता अवकाळीचं सावट असणारं हे चित्र विरून पुन्हा एकदा सूर्याच्या तीव्रतेमुळं राज्यात आगडोंब माजताना दिसत आहे.
प्रखर सूर्यकिरणांमुळं राज्यातील बहुतांश भागांमध्ये पारा चाळीशीपार गेला असून, सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला इथं करण्यात आली आहे, जिथं तापमान 44.1 अंश इतकं नोंदवण्यात आलं.
पुढील 24 तासांसाठी राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर, कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तिथं दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासाची शक्यता आहे. यादरम्यान या भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील असाही इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. राज्यातील मराठवाडा पट्ट्यात येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी सायंकाळनंतरही तापमानाचा चढा पारा अडचणी वाढवणार आहे. त्यामुळं राज्यात उष्णतेचच वर्चस्व असेल हेच इथं स्पष्ट होत आहे.
तिथं मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पारा चाळीशीपार गेला असतानाच मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही चित्र वेदळं नाही. मुंबईसह किनारपट्टी भागांत तापमानाचा आकडा काही अंशांनी खालावला असला तरीही हवेतील आर्द्रतेमुळं तापमानाचा दाह मात्र तुलनेनं अधिकच जाणवत आहे. पुढील 24 तासांमध्ये मुंबईत उष्ण- दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
देशातील कोणत्या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा?
केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीनं देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातसह 9 राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यामध्ये राजस्थानच्या सीमा भागात सर्वाधिक 45.6 अंश इतक्या तापमानाची नोंद केली गेल्यामुळं इथं देशातील सर्वाधिक उष्ण क्षेत्र असण्याची बाबही हवामान विभागानं स्पष्ट केली. फक्त उकाडाच नव्हे, तर देशाच्या ईशान्य आणि दक्षिण क्षेत्रामधील राज्यांना वादळी वारे आणि पावसाचा तडाखा बसणार असून, प्रामुख्यानं दक्षिणेकडील किनारपट्टी भागात नागरिकांनी सतर्क रहावं असा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….