इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण, प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोल्हापूर :- “इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांची बदनामी प्रकरणात महत्वाची अपडेट हाती आली आहे. या प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकर याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटरला जामीन मंजूर केला आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्याशी बोलताना प्रशांत कोरटकरने शिवीगाळ केली होती. प्रशांत कोरटकरवर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केल्याचा आरोप झाला. त्यानंतर प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरसहित राज्यातील विविध भागात फौजदारी गुन्हे नोंदवण्यात आले. पोलिसांत गुन्हे नोंदवल्यानंतर कोरटकर फरार झाला होता. पुढे कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळल्या होत्या.
प्रशांत कोरटकर गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होता. त्यानंतर आज बुधवारी प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश डी.व्ही.कश्यप यांनी जामीन मंजूर केला. त्यामुळे आता लवकरच कळंबा कारागृहातून कोरटकरची सुटका होणार आहे.
कोरटकर तुरुंगातून कधी बाहेर पडणार?
प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाल्यानंतर कळंबा कारागृहाबाहेर हालचाली वाढल्या आहेत. कारागृहाबाहेर पोलिस कर्मचारी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. जामीन मंजूर झाल्यावर प्रशांत कोरटकर हा कळंबा कारागृहातून बाहेर पडणार आहे. कोरटकर आज बाहेर पडणार की उद्या सकाळी हे पाहणे महत्वाचे आहे.
कोरटकर अजून दोन दिवस तरी बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. कोर्टात जामिनाची प्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र, कोर्टाला महावीर जयंतीमुळे उद्या सु्ट्टी आहे. त्यामुळे हे काम शुक्रवारी होईल. त्यामुळे कोरटकरची थेट शुक्रवारी सुटका होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….