मुंबईसह राज्यातील काही भागात अतिवृष्टी ; मराठवाडा ,विदर्भात ही पाऊसाची शक्यता
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी :
जुलैमध्ये काही भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे चिंता व्यक्त होत असतानाच ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याने मुंबई, ठाण्यासह कोकण विभागात बहुतांश ठिकाणी येत्या दोन दिवसांमध्ये मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिलाय.
मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही प्रामुख्याने घाटमाथ्याच्या क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान विदर्भासह राज्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी असणार आहे.
जूनमध्ये राज्यात चांगला पाऊस झाला असला, तरी जुलैच्या पावसाने अनेक भागांत हुलकावणी दिली.उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाच्या क्षेत्राचे संकेत आहेत. परिणामी राज्यात पावसाला अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे. याच स्थितीमुळे काही ठिकाणी अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस, तर तीन ते चार दिवस राज्यात सर्वत्र पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 3 ऑगस्टला पावसाचा जोर वाढणार आहे. या दिवशी कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील घाटक्षेत्रात मुसळधार पाऊस होईल. 4 ऑगस्टला कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. 5 ऑगस्टलाही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भातही कमी-अधिक पावसाचा अंदाज आहे.
तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड या भागांत अतिवृष्टी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार, तर नाशिक, नगर, सोलापूर, सांगली जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होईल, अस पुणे वेधशाळेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..