पंतप्रधान इंटर्नशिप स्कीमसाठी अर्ज करण्याचे आवाहन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि.19 :- पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम २०२५ साठी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये देशातील ७३८ हून अधिक जिल्ह्यांमध्ये देशातील ३०० हून अधिक टॉप कंपन्यांकडून १ लाख १९ हजार रुपयांहून अधिक किमतीच्या इंटर्नशिप ऑफर केल्या जात आहेत. जिल्ह्यातील युवकांनी यासाठी दि.३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जदार २१ ते २४ वर्षे वयोगटातील बेरोजगार तरुण असावा. फेरीमध्ये अर्जदार शेवटच्या तारखेपर्यंत त्यांच्या पसंतीच्या जिल्हा, राज्य आणि क्षेत्रानुसार कमाल ३ इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. जर एक ऑफर आवडत नसेल तर उमेदवार दुसऱ्यासाठी अर्ज करू शकता.
सन २०३० पर्यंत, दरवर्षी ७८.५ लाख महाविद्यालयांमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक दोन तरुणांपैकी अंदाजे एका तरुणाकडे रोजगारक्षम कौशल्ये नाहीत. हे लक्षात घेऊन सरकारने पीएम इंटर्नशिप योजना सुरू केली होती. यामध्ये तरुणांना कंपनीनुसार कौशल्य शिकण्याची संधी मिळणार आहे. वर्षभराच्या इंटर्नशिप दरम्यान प्रत्येक महिन्याला ५ हजार रुपये दिले जातात.
या फेरीत गॅस, ऊर्जा, बँकिंग आणि वित्तीय सेवा, प्रवास, ऑटोनॉटिक, धातू आणि खाण, उत्पादन, एफएमसीजी, आरआयएल, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, आयशर मोटर्स, एनटीपीसी, मार्टी सुझुकी आणि एल ॲण्ड टी या क्षेत्रातील अनेक कंपन्या इंटर्नशिप करतील. त्याचवेळी १० वी उत्तीर्ण तरुणांसाठी २४ हजार ६९६ इंटर्नशिपच्या संधी, आयआयटी झालेल्या तरुणांसाठी २३ हजार ६२९, डिप्लोमाधारकांसाठी १८ हजार ५८९, १२वी उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी १५ हजार १४२ आणि पदवीधरांसाठी ३६ हजरी ९०१ इंटर्नशिपच्या संधी उपलब्धआहेत.
उमेदवाराला https://pmintemship.mca.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. जे पुर्णवेळ नोकरीत नाहीत किंवा कुठेही पुर्णवेळ शिक्षण घेत नाहीत. उमेदवाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरी नसावी आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. पात्र उमेदवारांनी अर्ज करून सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प. भ. जाधव यांनी केले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….