कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री दत्त शिखर माहुर गड ची परिक्रमा यात्रा रद्द
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिवरा (महागाव)
अनिल बोंपिलवार
कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगात व देशात उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दत्तशिखर मंदिर, अनुसया माता मंदिर हे दि. 17 मार्च 2020 पासून दर्शनासाठी बंद केलेले आहे.

दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता सुरक्षेचा उपाय म्हणून पुढील आदेशापर्यंत दर्शन व्यवस्था बंद राहणार आहे तसेच रक्षाबंधनाच्या पौर्णिमेला श्री दत्त शिखर माहुर गड ला परिक्रमा यात्रा आयोजित करण्यात येते या यात्रेत लाखो भाविक भक्त सहभागी होतात परंतु यावर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे परिक्रमा यात्रा रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे कोणी भाविक भक्तांनी परिक्रमा यात्रेसाठी श्री दत्तशिखर माहुर गड येथे येऊ नये व प्रशासनास सहकार्य करावे असे सचिव श्री दत्तात्रय संस्थान शिखर माहूर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..