गोरगरिबांना, मजूर व सामान्य जनतेला अत्यावश्यक खरेदीसाठी लॉक डाऊन मध्ये दोन दिवसाची सुट्ट देण्यात यावी. रितेश पुरोहित मुख्य संपादक पॉलिटिक्स स्पेशल
पॉलिटिक्स स्पेशल स्पेशल लाईव्ह
पुसद
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्ण सतत वाढत असल्यामुळे जिल्ह्यात 22 तारखेपासून 28 तारखे पर्यंत लॉक डाऊन जाहीर करण्यात आले त्यानंतर पुसद दिग्रस व पांढरकवडा या तालुक्यात कोरोनाचा हॉस्पॉट तयार झाल्याने लॉक डाऊन मध्ये पुन्हा एकदा 28ते 31 जुलै पर्यंत वाढ करण्यात आली.
कोरोनाच्या रुग्णांची सतत वाढ होत असल्यामुळे त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी लॉकडाउन जाहीर केले. परंतु आज जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांनी आदेश काढून पुसद पांढरकवडा व दिग्रस या तालुक्यांमध्ये दिनांक 7 ऑगस्ट पर्यंत कडक लॉकडाऊन (संचारबंदी) लागू करण्याचे आदेश पारित केले आहे.वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करणे अत्यावश्यक होते पुसद, दिग्रस पांढरकवडा शहरात 7ऑगस्ट संचारबंद असल्याने एकुण 17 दिवस लगातार लॉकडाऊन असल्यामुळे या कारागिर, कामगार,मजूर, सामान्य गोरगरिब ज्याचे पोट हातावर आहे त्यांना जीवनावश्यक वस्तू, किराणा साहित्य, भाजीपाला खरेदी शक्य होत नसल्याने त्यांची उपासमार होत आहे अशा परिस्थितीत या मजूर,गोरगरिबांना व सामान्य जनतेला अत्यावश्यक खरेदी करण्यासाठी लॉक डाऊन मध्ये किमान दोन दिवस सूट देण्यात यावी जेणेकरून सामान्य फेरीवाले लहान गरीब,मजुरांना जीवनावश्यक साहित्य खरेदी करता येइल.
कोरोना या जागतिक महामारी ची साखळी तोडण्यासाठी लॉक डाऊन जितके आवश्यक आहे तितकेच लोकांना अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे सुद्धा आवश्यक आहे त्या करिता लॉक डाऊन संचारबंदीत दोन दिवसाची सूट देण्यात यावी अशी मागणी रितेश पुरोहित मुख्य संपादक पॉलिटिक्स स्पेशल यांनी जिल्हा अधिकारी यांच्या सह आमदार निलय नाईक,आमदार वजाहत मिर्जा तथा आमदार इंद्रनील नाईक यांच्या कडे केली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…