भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पुसद तालुका अधिवेशन संपन्न….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- स्थानिक सुभाष वार्ड येथे दि. १० मार्च २०२५ रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटी च्या सूचनेनुसार भाकप पुसद तालुका कमिटी चे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न झाले. यावेळी तालुका कार्यकारिणी ची निवड करण्यात आली असुन भाकप पुसद तालुका सचिव पदी कॉ. अमोल गवरशेट्टीवार यांची फेरनिवड करण्यात आली. तर सह सचिव पदी कॉ. साहेबराव राऊत , कॉ. डॉ. खुर्शीद वजुद व कॉ. निखिल टोपलेवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच सुरेंद्र गडदे, नारायण मुनेश्वर, समाधान बळी, संतोष ठामकेदार, शेख इकबाल भाई, मुमताज खान, अरुणा नेमाडे, सुलोचना वाघमारे, कविता काजळे, विष्णु सरकटे, प्रल्हाद अग्रवाल तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन कॉ. सुरेंद्र गडदे जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र किसान सभा, अध्यक्ष स्थानी कॉ. डॉ. खुर्शीद वजुद, तर निरीक्षक म्हणून जिल्हा कमिटी तर्फे कॉ. संजय भालेराव यांनी काम पाहिले. पक्षाचा मागील तीन वर्षातील अहवाल पक्षाचे तालुका सचिव कॉ अमोल गवरशेट्टीवार यांनी वाचन करून सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कॉ. निखिल टोपलेवार यांनी सादर केले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….