स्वस्त दरात वीज ते दुष्काळ मुक्त मराठवाडा, CM फडणवीसांनी मांडला विकासाचा रोडमॅप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकास रोडमॅप सांगितला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सरकारच्या आगामी काळातील महत्त्वाच्या योजना सांगताना विरोधकांना चिमटेही काढले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, 15 एप्रिलला 100 दिवस पूर्ण होत आहेत. त्यानंतर मंत्र्यांच्या कामाचे मूल्यमापन करणार आहे. ज्यांनी चांगले काम केले नसेल त्यांना निगेटिव्ह लिस्ट मध्ये टाकले जाईल. ज्यांनी चांगले काम केले त्यांचा सत्कार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निवडणुकीत मिळालेला जनादेश हा राज्याच्या विकासासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
– हे सरकार समन्वयाने चालणार सरकार आम्ही तिघेही निर्णय घेतो
– कापूस खरेदीसाठी अधिक केंद्र लागली तरी आपण देणार आहोत
– हे सगळे सोयाबीन उत्पादक राज्य पाहिले. तरीही 2 लाख मेट्रीक टन अधिक खरेदी आपण केली आहे. आजपर्यंतचा खरेदी रेकॉर्ड आपण मोडला आहे. याआधी सर्वाधिक खरेदी ही 2016-17 साली केली होती. काहींची खरेदी राहिली आहे. त्यासाठी केंद्राला मुदतवाढ मागितली आहे.
– सरकारी गोदामे भरली असल्याने खाजगी गोदाम घेतली आहेत. 50 हजार क्विंटल वर कापूस असेल तिथे नवीन केंद्र देण्याची सरकारची तयारी आहे
– महाराष्ट्राला कायमस्वरुपी दुष्काळ मुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे
– सात जिल्ह्यांतील 10 लाख एकर जमिनीला फायदा होईल. 426 किमीचे नवीन कालवा तयार करत आहे
– प्रकल्प अहवाल तयार करून प्रत्यक्ष कामास दोन वर्ष काम सुरु करण्यासाठी लागतील
– 6 ते 8 वर्षांच्या काम पूर्ण होईल. संपूर्ण विदर्भ दुष्काळ मुक्त दिसेल.
– मराठवाड्याला पाणी वळवण्यासाठी आपण निविदा काढली आहे
– जायकवाडी वरील बाजूस धरणे बांधली त्यामुळे तूट निर्माण झाली. त्यामुळे वाद निर्माण होतात, ते बंद होतील. नाशिक, नगर, संभाजीनगर हे वाद मिटतील. पिण्यासाठी मराठवाड्यात पाणी उपलब्ध होईल.
– संभाजीनगर व जालना हे नवीन औद्योगिक क्लस्टर निर्माण होतेय त्याला या पाण्याचा फायदा होईल
– बळीराजा मोफत वीज योजना जाहीर केल्यानंतर 45 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय
– 16 हजार मेगावॅट वीज सर्वाधिक कृषीला देणार महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे
– डिसेंबर 2026 पर्यंत सर्व वीज ही शेतकरी यांना सोलरच्या माध्यमातुन दिली जाईल
– शेतकऱ्यांना दिवसा 365 दिवस विज मिळणार आहे
– कोणाला ही रात्री पाणी पडण्याची गरज नाही
– 2030 पर्यंत 52 टक्के वीज ही अपारंपारिक ऊर्जेतून असणार आहे
– कोयना नदीतून वाहून जाणारे पाणी कोकणात कसे वापरता येईल, याचा अभ्यास सुरु आहे
– सर्व शेतकऱ्यांना आपण सोलारच्या माध्यमातून वीज मिळेल. 2o27 पासून आम्हाला ही सबसिडी लागणार नाही. शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज मिळणार आहे
– कार्बन उत्सर्जनात 25 टक्के घट ही एकट्या या योजनेमुळे होणार आहे. हाती घेतलेले प्रकल्प 2030 सालापर्यंत पूर्ण होतील.
– मागेल त्याला सौरकृषी पंप योजना सुरू केली. एका वर्षात पावणे तीन लाख सौर कृषी पंप दिले.
– या पंपापमुळे 14 लाख एकर जमिनीला सिंचन क्षमता प्राप्त झाली. 1 लाख 30 हजार घरगुती ग्राहकांनी रुफटॉप सोलर लावले.
– प्रधानमंत्री आवास योजनेच्या १ लाईक २० हजार घरांमध्ये योजनेत सोलर देणार आहोत. त्यामुळे त्यांना वीजेचे बिल येणार नाही.
– घरगुती ग्राहकांच्या 70 टक्के ग्राहक हे 0 ते 100 युनिट वाद वापरतात. त्यांना सोलार लावून पंतप्रधान योजनेतून अर्थात दीड कोटी ग्राहक हे वीज बिलातून मुक्त होतील.
– 95 टक्के घरगुती विजेचा दिलासा देणार. स्मार्ट मीटर लावला तर दिवसा वापरण्यात येणाऱ्या वीज बिलावर 10 टक्के रिबीट देणार
– वेगवेगळ्या क्षेत्रात करार केले देशात झालेल्या कराराचे गुंतवणूकीत रुपांतर होण्याचा दर 35 ते 45 टक्के आहे. आपल्याकडे हाच दर 80 ते 91 टक्के आहे. एक इंडस्ट्रीज करार केल्यानंतर संपूर्ण प्रकल्प सुरु करायला 5 ते 7 वर्षे लागतात
– आपण मॅग्नेटिक महाराष्ट्रात केलेल्या करारातील 80 टक्के करार हे उत्पादन लेव्हलला आहे
– गुजरात राज्याला जाहिरात बाजी करण्याची गरज नाही. आमचे विरोधकच जाहिरात करतात. गुजरात आघाडीवर, गुजरात आघाडीवर
– 1 लाख 39 हजार कोटींची परकीय गुंतवणूक मिळाली.गुजरातच्या तिप्पट गुंतवणूक आपण मिळवली आहे
– 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. यामुळं मराठवाड्याची वेगाने विकास होणाराय.कोकण व पश्चिम महाराष्ट्र हे मध्य भारताशी जोडले जाईल. समृद्धी,मुंबई-गोवा महामार्ग व शक्तीपीठ असा त्रिकोण तयार करायचा आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….