नव्या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी काम सुरू ; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता हे तीन नवे कायदे महाराष्ट्रात लागू करण्यासाठी राज्याचे गृह खाते वेगाने काम करीत असल्याची माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
संसदेने पारित केलेल्या या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज महाराष्ट्राची आढावा बैठक घेतली.
यापूर्वी अमित शहा यांनी गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाना या राज्यांकडून आढावा घेतला होता. या बैठकीनंतर फडणवीस यांनी पत्रकारांना माहिती दिली.हे तीन कायदे तयार झाल्यानंतर राज्यामध्ये त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करावयाच्या संस्था आणि मूलभूत सुविधांची तयारी आणि आतापर्यंत किती गुन्हे दाखल झाले, याची माहिती फडणवीस यांनी शहा यांना दिली. त्यानंतर ते म्हणाले, ”या तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी चांगल्याप्रकारे होत आहे.
सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी घटनास्थळी जाऊन साक्षी आणि पुरावे गोळा करण्याचे काम केले जाईल. नव्या कायद्यांविषयी ९० टक्के पोलिस दलाचे प्रशिक्षण झाले आहे. तुरुंग, फॉरेन्सिक विभाग किंवा सार्वजनिक संस्थांमध्ये साक्षींचे कक्ष तयार करून न्यायालयांना ऑनलाइन जोडण्याची तयारी केल्यामुळे आरोपींना न्यायालयात नेण्याची आवश्यकता कमी होईल. कमीतकमी वेळेत निकाल लावण्याच्या दृष्टीनेही प्रशिक्षण देण्यात येत आहे.”

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….