ग्वाटेमालात भीषण अपघात..! बस दरीत कोसळल्याने 55 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण जखमी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “ग्वाटेमालाच्या राजधानीपासून काही अंतरावर भीषण रस्ते अपघात झाल्याचे घटना समोर आली, ज्यामध्ये 55 जणांचा मृत्यू झाला. बस दरीत कोसळल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
सोमवारी (10 फेब्रुवारी) ही थरकाप उडवणारी घटना घडली. ग्वाटेमालाच्या सार्वजनिक मंत्रालयाच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, 53 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सॅन जुआन डी डायओस रुग्णालयात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला.
दुसरीकडे, अग्निशमन दलाचे प्रवक्ते एडविन व्हिलाग्रान यांनी सांगितले की, पहाटेच्या आधी अनेक वाहनांच्या अपघातामुळे (Accident) बस रस्त्यावरुन पुलाखाली असलेल्या खोल दरीत कोसळली. ज्यामध्ये 55 जणांचा मृत्यू तर इतर काही प्रवासी गंभीर जखमी झाले. बस 1145 फूट (35 मीटर) खोल दरीत कोसळली. ही बस राजधानीच्या ईशान्येकडील प्रोग्रेसो येथून आली होती. मृत्यू झालेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. ग्वाटेमालाचे राष्ट्राध्यक्ष बर्नार्डो अरेव्हालो यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून राष्ट्रीय शोक दुखवटाही जाहीर केला आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….