अवैध दारू विक्री करणारे बाबू तातेवार व त्यांच्या भावांना अटक ; 12809 रुपयांचा मुद्देमाल जप्त ; पुसद शहर पोलिस स्टेशनची कारवाई
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
पुसद मध्ये लॉक डाउन (संचारबंदी)लागू असल्याने पुसद शहरातील देशी विदेशी दारू दुकाने,बियर बार सह सर्व प्रतिष्ठाने बंद आहेत. जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी संचार बंदी चे शहरात कलम लागू केले आहे अशा स्थितीत सुभाष वार्डातील तातेवार बंधू हे आपल्या घरी देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जमा करून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दिनांक 25 रोजी रात्री शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार पी.व्ही. फाडे यांनी आपल्या स्टाफ ला सोबत घेऊन आरोपी बाबू नारायण तातेवार आणि बालाजी नारायण तातेवार यांच्या एकत्रित असलेल्या घरांमध्ये धाड मारली आणि देशी-विदेशी रुपये 12809 किमतीची दारू जप्त केली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तातेवार बंधू मागील काही महिन्यापासून घरांमध्ये दारूच्या बाटल्या ठेवून विक्री करत असल्याने दारूबंदी कायदा 65 व्ही व 188 व269 अनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पुसद शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार पी,व्ही फाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगोले ,कुणाल रुडे ,दीपक ताटे शिधोधन भगत, कांबळे व महिला पोलीस ज्योती राठोड यांनी आहे या कारवाईमुळे पुसद शहरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..