राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये एफआयआर, राजकीय स्टंट असल्याची काँग्रेसची टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
गुवाहाटी :- “काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कथितरित्या देशाच्या सार्वभौमत्त्वाला धोका निर्माण होईल अशी टिप्पणी केल्याचा आरोप करून आसाममध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅड. मोनजित चेतिया यांनी पानबाजार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
काँग्रेस मुख्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान राहुल गांधी यांनी ”काँग्रेसला केवळ भाजप आणि संघाशी नाही तर त्यांनी ताब्यात घेतलेल्या सरकारी संस्थेचाही सामना करायचा आहे, आपल्याला राज्य यंत्रणांशी लढा द्यायचा आहे,” असे वक्तव्य केले होते. राहुल यांनी देशविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही तक्रार राजकीय स्टंट आहे अशी टीका आसाम विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांनी केली. दरम्यान, २०१९च्या लोकसभा निवडणूक प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल राहुल गांधी यांच्याविरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्याच्या कार्यवाहीला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली.
‘सरसंघचालकांनी माफी मागावी’
नवी दिल्ली : सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वातंत्र्य चळवळीबद्दल केलेल्या देशविरोधी विधानाबद्दल माफी मागावी या मागणीचा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवरील पोस्टमध्ये पुनरुच्चार केला. राम मंदिर बांधले त्याच दिवशी देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले, १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळालेले स्वातंत्र्य राजकीय होते, असे विधान भागवत यांनी केले होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….