ठाकरेंचे १६ तर काँग्रेसचे १० आमदार करणार शिवसेनेत प्रवेश?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शिवसेना (शिंदे गटाची) २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईसह राज्यभर सदस्य नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
या वेळी महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वांद्रे बीकेसी येथील मैदानावर २३ जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानिमित्त शिवसेनेच्या वतीने लाडक्या बहिणींना निमंत्रित केल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे १६ आमदार आणि काँग्रेसचे १० आमदार शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार असून, काही खासदारही संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….