पैनगंगा नदी पात्रात अनोळखी मृतदेह आढळला
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
उमरखेड तालुक्यातील पैनगंगानदी पात्रात मानवी मृतदेह वाहत येत असल्याचा व्हिडिओ उमरखेड तालुक्यात चर्चेचा विषय झाला असताना मृतदेह चातारी, दिघी ,बोरी, गांजेगाव कोल्हापूरी बंधाऱ्याच्या खालून पाण्यावर पैनगंगा नदी पात्रात तरंगत पुढे सहस्रकुंड कडे पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत गेला दिवसभरा मध्ये हादगाव, हिमायतनगर, किनवट, महागाव , उमरखेड या तालुक्यांमध्ये चर्चा होत असताना बिटरगाव पोलीस ठाणेदार विजय चव्हाण यांनी सतर्कता बाळगत पैनगंगा नदी घाटच्या सर्व ग्रामस्थांना सतर्क केले
पैनगंगा नदी पत्रावत मुरली येथील बंधाऱ्यावर एक मृतदेह पैनगंगा नदी पात्रात वाहून जात विदर्भ मराठवाडा सीमेवर असलेले गाव सतर्क झाले व पैनगंगा नदी पात्रावर उमरखेड तालुक्यातील मुरली गावाचे पोलीस पाटील मिथुन राठोड यांनी तो मृतदेह स्वतः बघितल्यानंतर ही माहिती बिटरगाव पोलीस ठाणेदार विजय चव्हाण यांना कळवली त्यानंतर मृतदेहाला नदीपात्रातून सकाळी 10 वाजता बाहेर काढण्यात आले मृतदेह अनोळखी असून त्या मृतदेहाची ओळख पटली नाही मृतदेह पुरुष आहे वय 40 ते 45 वयोगटाचा आहे
वैद्यकीय अधिकारी यांनी शव इच्छेदन करून त्या मृतदेहावर पोलीस समक्ष अंत्यसंस्कार करण्यात आले या मृतदेहाचा तपास बिटरगाव पोलीस ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रामकिसन जायभाये व त्यांचे सहकारी करत आहे

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..