..आणि मुनगंटीवार नाराज असल्याचे पुन्हा सिद्ध झाले…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव,अनुमोदन करणारे पण त्यांच्याच मंत्रिमंडळात मंत्रीपद न मिळालेले भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विदर्भातील काही भाजप आमदारांची नाराजी आज पुन्हा एकदा सिद्ध झाली.
भाजपतर्फे विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपुरात झालेल्या जाहीर सत्कार समारोहाला त्यांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवली.
संजय कुटे यांचेही फडणवीस यांच्या निकटवर्तीयामध्ये नाव असताना मंत्रिपदासाठी डावलले गेले. मात्र ते आजच्या सत्कारात हजर होते. अनेक आमदार कार्यक्रम संपताना नागपुरात पोहोचले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मंत्री, आमदारांचा सत्कार करण्यात आला. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासह रणधीर सावरकर, चैनसुख संचेती, संजय कुटे, श्याम खोडे, सईताई डहाके, प्रताप अडसड, राजेश वानखेडे, केवलराम काळे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर, राजू तोडसाम, सुमित वानखेडे, राजेश बकाणे, समीर कुणावार, देवराव भोंगळे, किशोर जोरगेवार, बंटी भांगडिया, मिलिंद नरोटे, विजय रहांगडाले, संजय पुराम, मोहन मते, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, चरणसिंग ठाकूर, आशीष देशमुख, समीर मेघे यांच्यासह विदर्भातील आमदारांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांचाही सत्कार करण्यात आला.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….