आणि “या” आमदाराने दिला थेट राजीनाम्याचा इशारा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर निवडून आलेल्या आमदारांनी कार्यभार स्वीकारल्यावर महिन्याभरातच मतदार संघातील पाण्याच्या मुद्द्यावर या निवडून आलेल्या आमदाराने पक्षश्रेष्ठींना थेट राजीनाम्याचा इशारा दिला आहे.
मतदारसंघातील शेतकरी पाण्यासाठी त्रस्त आहेत. आदिवासींना शेतीसाठी अनेक वर्ष पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यांच्याविषयी जलसंपदा विभागाकडून उपेक्षा केली जाते. इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांचा संताप आहे. इगतपुरी तालुक्यातील धरणांचे पाणी शहापूरला दिल्यास प्रसंगी आमदारकीचा राजीनामाच देऊ, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
विधिमंडळात भावली धरणाचे पाणी अन्य जिल्ह्यांना देण्यात आमदार खोसकर यांनी तीव्र विरोध केला होता. याबाबत त्यांनी जलसंपदा विभागासह संबंधित मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे. अधिवेशन संपल्यानंतर सध्या ते मतदारसंघात आले आहेत आपल्या त्या मागणीसाठी आपण ठाम असून राज्य शासनाने भावली धरणाचे पाणी अन्य जिल्ह्यांना दिल्यास आपण राजीनामा देऊ यावर ठाम आहोत, असा दावा त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर मतदारसंघातील मतदारांच्या अडचणींसाठी आक्रमक झाले आहेत. मतदारसंघातील धरणांचे पाणी अन्य जिल्ह्यांना दिले जाते. मात्र मतदारसंघातील आदिवासी आणि शेतकरी शासनाच्या उदासीनतेमुळे उपेक्षित राहतात, अशी नाराजी खोसकर यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी मतदारसंघातील भावली धरणाच्या पाण्यासाठी साकडे घातले आहे. इगतपुरीच्या भावली धरणाचे पाणी शहापूर तालुक्याला देण्याचा घाट घालण्यात आला आहे.
काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून खोसकर २०१९ ला निवडून आले होते. त्यांच्यावर क्रॉस वोटिंग चा आरोप करण्यात आला. काँग्रेस पक्षातील अंतर्गत विसंवादातून त्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यावर त्यांनी इगतपुरी मतदारसंघातून उमेदवारी केली. ते दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. निवडणुकीचा निकाल लागून महिनाही झाला नाही, तोच त्यांनी थेट पक्ष नेत्यांना आणि सरकारला राजीनाम्याचा इशारा दिल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….