पुसद तालुका सात ते दहा दिवस लॉकडाऊन करा ; तिन्ही आमदारांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी.
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :
तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनता शासनाचे नियम काटेकोरपणे पाळत नसल्याने तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे यावर प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याचे विधानसभा सदस्य आमदार इंद्रनीलभाऊ नाईक , विधान परिषद सदस्य आ. निलयभाऊ नाईक , विधान परिषद सदस्य आ. डॉ. वजाहतजी मिर्झा या तीनही आमदारांनी जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिंह यांच्याकडे मागणी केली आहे. सदर मागणी मान्य करून पुसद मध्ये कडकडीत बंद (संचारबंदी) लागु करावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

पुसद शहरातील मार्केटमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी पहावयास मिळत असुन बहुतांश जनतेच्या तोंडावर मास्क नसल्याचे आढळून आले, दुकानावर , बँकेत , बाजारपेठेमध्ये सोशल डीस्टँशींग चा चांगलाच फज्जा उडाल्याचे चित्र निरदर्शनास आले आहे. परिणामी संक्रमण वाढीचा धोका जास्त असल्यामुळे पुसद तालुक्यात व शहरात तीन दिवस अगोदर पूर्वसुचना देऊन सात ते दहा दिवसासाठी संपुर्ण लोकडाऊन लावण्याची परवानगी बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..