जिल्ह्यात कोराना बाधितांच्या संख्येचा आलेख वाढतोय ; आज नव्याने ३० जणांना कोरानाची लागण ; तर एकाचा मृत्यु; ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : 17 जणांना सुट्टी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ ( १८ जुलै) :
जिल्ह्यात आज (दि. 18) एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याने मृत्युची संख्या 17 झाली आहे. तर 30 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. तसेच आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरुवातीला पॉझेटिव्ह आलेले 17 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
शनिवारी मृत्यु झालेला व्यक्ती (वय 53) हा पुसद शहरातील दुधे ले-आऊट येथील रहिवासी होता. तसेच नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 30 जणांमध्ये 16 पुरुष आणि 14 महिला आहेत. यात नेर शहरातील चिरडे ले-आऊट येथील तीन पुरुष व तीन महिला, नेर शहरातील जलाराम नगर येथील एक पुरुष, नेर शहरातील शिवाजी नगर येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील तारपुरा येथील एक महिला तसेच आणखी यवतमाळ येथील दोन पुरुष व एक महिला, घाटंजी तालुक्यातील चार पुरुष व पाच महिला, कळंब तालुक्यातील जोडमोह येथील एक पुरुष, दिग्रस येथील चार पुरुष व चार महिला पॉझेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात शनिवारपर्यंत 144 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात आज 30 जण नव्याने पॉझेटिव्ह आल्याने हा आकडा 174 वर पोहचला. मात्र ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 17 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 157 आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 100 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 57 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 548 एवढी आहे. यापैकी 374 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 17 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 127 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने 9192 नमुने पाठविले असून यापैकी 8973 प्राप्त तर 156 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 8425 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
०००००००

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..