महायुतीचा जातीय सलोखा; फडणवीस 3.0 मंत्रिमंडळात प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महायुतीला विक्रमी बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार, यावर मोठा खल सुरू होता. मुख्यमंत्रिपदाचा तिढा मिटल्यानंतर कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे आणि कोणती खाती दिली जाणार यावरून गेल्या 15-20 दिवसांपासून चर्चा सुरू होती.
अखेर रविवारी मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणी शपथ घेतली, हे समोर आले आहे. त्यानुसार या मंत्रिमंडळात जातीय सलोखा राखला गेल्याचे दिसते आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यात यात भाजप 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी शपथ घेतली.
या मंत्रिमंडळात भौगोलिक, आर्थिक, जातीय सलोखा साधण्यात आल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे- ओबीसी
राधाकृष्ण विखे पाटील- मराठा
गिरीश महाजन- गुर्जर ओबीसी
चंद्रकांत पाटील- मराठा
जयकुमार रावल-राजपूत
पंकजा मुंडे – विधान परिषद आमदार बंजारा समाज -ओबीसी
पंकज भोयर- कुणबी मराठा
मंगल प्रभात लोढा- मारवाडी
शिवेंद्रराजे भोसले- मराठा
मेघना बोर्डीकर- मराठा
नितेश राणे- मराठा
माधुरी मिसाळ – ओबीसी
गणेश नाईक- ओबीसी
आशिष शेलार- मराठा
संजय सावकारे- अनुसूचित जाती
आकाश फुंडकर – कुणबी मराठा – ओबीसी
जयकुमार गोरे- ओबीसी
अतुल सावे- ओबीसी माळी
अशोक उईके – आदिवासी
गुलाबराव पाटील – गुर्जर – ओबीसी
दादा भुसे – मराठा
संजय शिरसाट – अनुसूचित जाती
उदय सामंत- कायस्थ ब्राह्मण
शंभूराजे देसाई- मराठा
भरत गोगावले- ओबीसी मराठा कुणबी
संजय राठोड – ओबीसी बंजारा
आशिष जैस्वाल – ओबीसी बनिया
प्रताप सरनाईक- मराठा
योगेश कदम – मराठा
प्रकाश आबिटकर- मराठा
अदिती तटकरे – ओबीसी
नरहरी झिरवाळ – आदिवासी
बाबासाहेब पाटील – मराठा
हसन मुश्रीफ- मुस्लिम अल्पसंख्याक मुस्लिम चेहरा
दत्तात्रय भरणे – धनगर समाज
धनंजय मुंडे – बंजारा ओबीसी
इंद्रनील नाईक – मराठा
मकरंद पाटील – मराठा
माणिकराव कोकाटे- मराठा
भाजपचे सर्वाधिक 132 आमदार निवडून आले आहेत. भाजपकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 मंत्रीपदे आहेत. शिवसेनेचे 57 उमेदवार निवडून आले असून एकनाथ शिंदेंसह 12 मंत्रिपदे दिली आहेत. तर अजित पवार गटाचे महायुतीमध्ये 41 आमदार आहेत. त्यांना अजित पवारांसह 10 मंत्रिपदे देण्यात आली आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..