तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन, वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला.
उस्ताद झाकीर हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते. त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लाह राखा कुरेशी आणि आईचे नाव बीवी बेगम होते. झाकीर यांचे वडील अल्ला राख हेही तबलावादक होते.
झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमधून झाले. याशिवाय मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधूनही पदवीचे शिक्षण घेतले.
झाकीर हुसैन यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. 1973 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ लाँच केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..