राज्यातील ‘या’ चार आमदारांना मंत्रीपद देऊ नका; या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थी संघटनांच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- “राज्यात महायुतीच सरकार येऊन वीस दिवसाचा कालावधी उलटून गेला. या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवत आहेत.पण इतर खात्याची मंत्रिपद केव्हा जाहीर होतात आणि या महायुती सरकारमधील कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार,याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस, भीम आर्मी स्टुडन्ट फेडरेशन आणि पुरोगामी विद्यार्थी संघटनाकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महायुती सरकारमधील शिंदे गटाचे आमदार संजय राठोड, आमदार अब्दुल सत्तार,आमदार तानाजी सावंत आणि भाजपचे आमदार नितेश राणे या चार आमदारांना मंत्रीपदे देवू नका,या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले.
तसेच यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.यावेळी अक्षय कांबळे म्हणाले की, मागील सरकारमध्ये शैक्षणिक विभागात अब्दुल सत्तार यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप,तर आरोग्य विभागामध्ये तानाजी सावंत यांनी देखील भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.तसेच एका तरुणीच्या मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर समाजात तेढ निर्माण करणारी विधान भाजपचे आमदार नितेश राणे हे सातत्याने करित आले आहेत.यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या चार आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये,अन्यथा भविष्यात विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.
हे आंदोलन सुलतान शाह यांच्या नेतृत्वाखाली झाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..