कोरेगाव-भीमा येथे शौर्यदिन साजरा करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी ; २२ डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान तयारीस शासनाला अनुमती…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “येत्या १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथील लढाईच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा होणाऱ्या कार्यक्रमाची व्यवस्था करण्यासाठी तसेच ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारला उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारने उच्च न्यायालयात परवानगीसाठी याचिका केली होती. न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या एकलपीठाने या याचिकेची दखल घेऊन विजयस्तंभाच्या वादग्रस्त जागेवर प्रवेश करण्यासाठी राज्य सरकारला परवानगी दिली. त्यानुसार, २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत सरकरला कार्यक्रमाची तयारी करण्यास परवानगी असणार आहे. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ५ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत सर्वसामान्यांना येथे प्रवेश देण्यात येईल, असेही न्यायालयाने नमूद केले.
सहा वर्षांपूर्वी २०१८ मध्ये कोरेगाव- भीमा या ठिकाणी दंगल उसळल्यानंतर ती जागा वादग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली. दंगल उसळल्यानंतर शौर्यदिनी विजयस्तंभाच्या जागेवर न्यायालयाच्या परवानगीशिवाय प्रवेश दिला जात नाही. म्हणूनच राज्य सरकार परवानगीसाठी न्यायालयात याचिका करते. त्यानंतर, न्यायालयाकडून या जागेत ठराविक कालावधीसाठी प्रवेशाची मुभा दिली जाते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..