निकालाची उत्सुकता शिगेला : आज नाही तर ‘या’ तारखेला लागणार 12वीचा निकाल, बोर्डानं केलं स्पष्ट
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी :
कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्र बोर्डाचे दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर लवकर निकाल लागेल अशी आशा विद्यार्थ्यांना आहे. दरम्यान 14 तारखेला निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आज निकाल लागणार नसल्याचे महाराष्ट्र बोर्डानं जाहीर केले आहे. अद्याप निकाल कधी लागणार याची अंतिम तारखा जाहीर करण्यात आल्या नाही आहेत.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याआधी 10वी-12वीचे निकाल हे 15 ते 20 जुलै दरम्यान लागण्याची शक्यता असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळं 12वीचे निकाल 20 जुलैच्या आधी लागण्याची शक्यता आहे. हे निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
या वर्षी इयत्ता बारावीच्या 13 लाखहून अधिक तर दहावीच्या 17 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. बारावीचे निकाल 15 जुलै तर दहावीचे निकाल जुलै अखेरपर्यंत जाहीर केले जातील अशी माहिती मिळत आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे.
तर, कोरोनामुळे 23 मार्च रोजी होणार दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला असून अन्य विषयांच्या सरासरी गुणांच्या आधारावर या विषयाचे मार्क दिले जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे 11 वीच्या प्रेवशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 15 जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार असून निकाल लागल्यानंतर महविद्यालय निवड प्रक्रिया करता येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..