फडणवीस हा मुख्यमंत्री चेहरा होऊ शकते का…? ; प्रदेशाध्यक्षांनी दिलेला सूचक उत्तराने खळबळ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचा मुख्यमंत्री पदासाठी कोणाचा चेहरा असेल? असा प्रश्न राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या मनात उपस्थित होत आहे.
अशात भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच या विषयावरील कोंडी फोडत म्हटले की, विधानसभा निवडणुकीत महायुती मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून कोणाला प्रोजेक्ट करेल यावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.
फडणवीस मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकतात का?
महाराष्ट्रात यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी ‘महायुती’चा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल? याबाबत चंदशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, याबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि मित्रपक्ष योग्य वेळी निर्णय घेतील. ते पुढे म्हणाले की, राज्यात उपमुख्यमंत्री फडणवीस हेच पक्षाचे नेते राहतील.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री चेहरा होऊ शकतात का? असे विचारले असता बावनकुळे यांनी महायुतीचे राज्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडवणे आणि विकासाला प्रधान्य आहे, असे म्हणत या प्रश्नाला बगल दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
बावनकुळे पुढे म्हणाले की, “जेव्हा मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा भाजपचे केंद्रीय नेतृत्व, महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव आणि महायुतीचे नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र निर्णय घेतील.”
लोकसभा निवडणुकीच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. पण तो आता त्यांनी बदलला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
दिल्लीत भाजपच्या कोअर ग्रुपच्या बैठकीत सहभागी होऊन परतलेल्या बावनकुळे यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांना फडणवीस हे सत्ताधारी आघाडीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील का, असे विचारले असता बावनकुळे म्हणाले की, याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.
याबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि आघाडीचे सहकारी निर्णय घेतील. फडणवीस हेच राज्यात त्यांच्या पक्षाचे नेते राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….