उत्तर प्रदेश मधील जनतेचे आभार मानण्यासाठी काँग्रेस कडून “धन्यवाद यात्रे” चे आयोजन ; कसं असेल स्वरूप…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीला मोठं यश मिळालं आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीने ८० जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ४३ जागांवर इंडिया आघाडीला विजय मिळाला. उत्तर प्रदेशातील या विजयाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
अशातच आता काँग्रेसकडून उत्तर प्रदेशच्या जनतेचे आभार मानण्यासाठी ‘धन्यवाद यात्रे’चं आयोजन करण्यात आलं आहे.
कसं असेल यात्रेचं स्वरुप?
११ ते १५ जून दरम्यान काँग्रेसची ही धन्यवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा ४०३ लोकसभा मतदारसंघातून प्रवास करणार आहे. तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेतेसुद्धा या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा संदेश देण्याचा प्रयत्न या ‘धन्यवाद यात्रे’द्वारे केला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यादरम्यान नागरिकांना संविधानाची प्रत भेट म्हणून दिली जाणार असल्याचीही माहिती आहे.
उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीला मोठं यश :
दरम्यान, या निवडणुकीत इंडिया आघाडीने उत्तर प्रदेशात ८० जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी इंडिया आघाडीला ४३ जागांवर विजय मिळाला. या ४३ जागांपैकी काँग्रेसने ६ तर समाजवादी पक्षाने ३७ जागा जिंकल्या आहेत. तसेच या निवडणुकीत भाजपाला ३३ जागांवर विजय मिळाला आहे.
महत्त्वाचे म्हणजे २०१९ च्या तुलनेत यंदा काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला मोठं यश मिळालं आहे. २०१९ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे प्रदर्शन अतिशय खराब राहिले होते. या निवडणुकीत दोघांना मिळून केवळ ६ जागांवर विजय मिळवला आला होता.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..