सुशांतने आत्महत्येच्या तीन दिवसापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांचे पगार दिले व म्हणाला……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. त्याच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण होतं, याचा तपास मुंबई पोलीस घेत आहेत. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतने आत्महत्येच्या तीन दिवसांपूर्वी त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार दिले होते. पगार देताना त्याने कर्मचाऱ्यांना असंही म्हटलं होतं की, त्याला यापुढे पैसे देणं शक्य होणार नाही.
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांचा जबाब नोंदवला आहे. एका वेब सीरिजमधील भूमिकेसंदर्भात सुशांत दिशा सालियनसोबत चर्चा करत होता अशी माहिती त्याच्या एका मॅनेजरने पोलिसांना दिली. दिशा सालियन ही आधी सुशांतकडेच मॅनेजर म्हणून काम करायची. सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच तिनेसुद्धा आत्महत्या केली होती. मात्र या दोघांच्या चर्चेबाबत अद्याप ठोस काही माहिती मिळाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.सुशांतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट अद्याप प्रेक्षकांच्या भेटीला यायचा आहे. हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करावा अशी जोरदार मागणी त्याच्या चाहत्यांकडून होत आहे. ‘छिछोरे’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘काइ पो चे’, ‘केदारनाथ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीबाबत सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..