जिल्ह्यात खळबळ : आणखी एक पॉझिटिव्ह. त्या मृत पॉझेटिव्ह रुग्णाबरोबर आलेल्या चार पैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ,
मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील मात्र मुंबई येथे पॉझेटिव्ह आढळलेल्या व्यक्तिला रुग्णवाहिकेने येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणतांना त्यांचा मृत्यु झाला. त्यामुळे त्यांच्यावर येथे उपचार करणेही शक्य झाले नाही. रुग्णवाहिकेत या मृतकासोबत आलेल्या चार जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले असून त्यांचे नमुने तपासणीकरीता लगेच पाठविण्यात आले होते त्या मृत व्यक्ती बरोबर अंबुलन्समध्ये काल मुंबईहून आलेल्या एका ड्रायव्हरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर उर्वरित तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत त्यामुळे सध्या स्थिती जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या एकूण 19 झाली आहे. एका व्यक्तीला मुंबईहून यवतमाळ येथे आणत असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला होता
दिग्रस तालुक्यातील आरंभी येथील राजेश कालू राठोड (वय 43) हे मुंबई घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पीटलमध्ये गत चार दिवसांपासून भरती होते. मात्र तेथून MH 06 J- 8828 या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत राजेश राठोड, त्यांचा भाऊ आणि तीन चालक यवतमाळकडे निघाले. शनिवारी सायंकाळी सदर रुग्णवाहिका राजेश राठोड यांना घेऊन येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहचली. मात्र प्रवासादरम्यान रुग्णवाहिकेमध्येच राजेश राठोड यांचा मृत्यु झाल्याचे निदर्शनास आले. वैद्यकीय महाविद्यालयाने मृतकाचे सर्व रिपोर्ट मुंबईवरून मागविले असून त्यांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आहेत.
त्या मृत व्यक्ती व्यक्ती सोबत आलेल्या ॲम्बुलन्सच्या ड्रायव्हर चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात आता एकच खळबळ उडाली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..