पोलिसांचे असेही कर्तव्य पालन : बाप-लेकीचे प्राण वाचवण्यासाठी पोलिसाची खोल विहिरीत उडी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपुर गावात रात्री साडेआठ वाजता घराजवळील सार्वजनिक विहिरीजवळ खेळत असताना एक लहान मुलगी व तिचे वडील दोघेही विहीरीत पडले. घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोहोचलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने क्षणाचाही विचार न करत विहीरीत उडी घेत बाप लेकीचे प्राण वाचवले.

वडील प्रभाकर बारेकर व त्यांची अडीच वर्षाची मुलगी शिवण्या हे दोघे विहिरीच्या काठावर खेळत होते.त्याचवेळी अचानक मुलीचा तोल जाऊन मुलगी विहिरीत पडली, तिला वाचविण्यासाठी प्रभाकर यांना पोहता येत नसतानाही त्यांनी विहिरीत उडी घेतली. दोघे जण विहिरीत पडल्याची माहिती मिळताच पोलीस सहायक निरीक्षक व पोलीस जांभळे व शिपाई परमेश्वर नागरगोजे हे तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यानंतर नागरगोजे यांनी 40 फूट विहिरीत उडी मारून बाप लेकीला सुखरूप बाहेर काढल आणि त्यांचा प्राण वाचविला. त्या दोघांनाही शंकरपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आलं, पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून जराही वेळ वाया न जाऊ देता त्या बाप लेकीचं प्राण वाचविण्यात यश आले, पोलिसांनी केलेल्या या धाडसामुळे परिसरात कौतुका चे वर्षाव होत आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!