यवतमाळ पुर्वपदावर येण्यास झाली सुरूवात

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळातील कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या १६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. हे रिपोर्ट आज (दि.२५) सकाळी वैद्यकिय महाविद्यालयाला प्राप्त झाले. यात यवतमाळ येथील ५, दिग्रस १, दारव्हा ३, आर्णी १, घाटंजी १, पुसद २, कळंब १, माहुर १, छत्तीसगढ़ १, येथील रिपोर्टचा समावेश आहे. तसेच एक रिपोर्ट अप्राप्त आहे, असे महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.
१७ पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डमध्ये ३१ जण भरती
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये १७ ॲक्टिव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण ३१ जण आहे. यात १४ प्रिझमटिव्ह (शक्यता असलेले) केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.रविवारी (दि.२४) चार जण आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ११३ वर गेली असून यापैकी ९६ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये १७ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण भरती आहेत. संस्थात्मक विलगीकरण कक्षात १३ जण तर गृह विलगीकरणात ४९१ जण आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..