दिवंगत कार्यकर्त्यांच्या लेकीचे बच्चू भाऊंनी केले कन्यादान!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या अचलपुर रायपुरा येथील सुधीर डकरे यांच्या कन्येच्या विवाहाचे कन्यादान स्वतः बच्चूभाऊंनी उपस्थित राहून केले. डकरे यांनी राज्यमंत्री कडू यांना जी अनमोल साथ दिली होती.त्यांच्या ऋणानुबंधची जाणीव ठेवत त्यांच्या पश्चात ते नेहमीच या कुटुंबाच्या सोबत राहिले. आज जेव्हा त्यांची कन्या सासरी नांदायला निघाली तेव्हा बच्चूभाऊ आणि त्यांच्या पत्नी प्रा. नयना कडू दोघेही गहिवरून गेले.

सुधीर डकरे हे बच्चू कडू यांचे कट्टर कार्यकर्ते. ते नेहमीच भाऊंच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबतच्या उपक्रमात सहभागी असायचे. २०१४ मध्ये सुधीर डकरे चा आकस्मिक मृत्यू झाला.त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले मात्र बच्चू कडू यांनी या कुटुंबाला नेहमी धीर दिला. अडचणीच्या प्रसंगात त्यांच्या सोबत उभे राहिले.
अनेकदा राजकीय कार्यकर्त्यांच्या वाटयाला उपेक्षा येते. कार्यकर्त्यांच्या कुटूंबाची ससेहोलपट होते.कार्यकर्त्यांच्या पश्चात तर नेत्यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.पण कार्यकर्ते सांभाळण्याचा, त्यांच्या सुखदुःखात पाठीशी राहण्याचा राज्यमंत्री कडू यांचा पॅटर्न वेगळा आहे.
सुधीर डकरे यांच्या मुलीचा विवाह होता या विवाहास स्वतः ना. बच्चु कडू व त्यांची पत्नी प्रा. नयना कडू या हजर होत्या.त्यानी स्वतः वैष्णवीचे त्यांनी कन्यादान केले. हे दृष्य बघून लग्न मंडपात भावुक वातावरण निर्माण झाले होते. वैष्णवीचा विवाह अमरावती देऊरवाडा येथील अमोल दातीर यांच्यासोबत झाला.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…