महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण; उपचारांना तात्काळ सुरुवात
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. मंत्रिमंडळ बैठक तसेच इतर कामांसाठी अशोक चव्हाण यांचा नांदेड ते मुंबई हा प्रवास सतत सुरुच होता. या प्रवासादरम्यानच त्यांना बाधा झाल्याचं पीटीआय सूत्रांकडून समोर आलं आहे. अशोक चव्हाण हे ६१ वर्षांचे असून २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा आली होती. जवळपास २ वर्षं त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषविलं आहे.दरम्यान याआधी राज्य मंत्रिमंडळातील जितेंद्र आव्हाड यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. 
मात्र जितेंद्र आव्हाड या संकटातून आता सुखरुप बाहेर पडले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा रविवारी रात्री ५० हजार २०० च्या पुढे गेला. यामधील १६३५ रुग्णांचा मृत्यू झाला असून १४ हजार ६०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रविवारी एकाच दिवसात ३ हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले.मुंबईतील एकूण बाधितांचा आकडा ३० हजार ५०० पार गेला असून मुंबईतील मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ९८८ वर गेली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….