अरबी समुद्र भूकंपाच्या धक्क्यांनी थरथरला, पालघरलाही जाणवले धक्के ४.१ नोंदवली तीव्रता….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- अरबी समुद्रात शुक्रवारी रात्री भूकंपाचे झटके जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितेले की, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.१ नोंदवली गेली.राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, भूकंपाचे धक्के रात्री ९ वाजून ५२ मिनिटांनी जाणवले.
याचा केंद्रबिंदू कोठे होता याची माहिती अजून समोर आलेली नाही.
पालघर जिल्हाही भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. रात्री ९ वाजून ५३ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के बसले आहेत. गेल्या तीन दिवसात हा दुसरा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.
तलासरी, उधवा, मोडगाव ,धानिवरी, धुंदलवाडी, कासा ,उर्से या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. हा भूकंप ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.
जपानमधील भूकंपामुळे मृतांचा आकडा वाढला-
पश्चिम जपानमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात आतापर्यंत ६२ नागरीक ठार झाले आहे. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सुझू,इशिकावा प्रीफेक्चर,जपानमध्ये बुधवारी भूकंपामुळे अग्निशमन दल आणि पोलीस किनारी भागात अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत आहेत.पश्चिम जपानमधील शक्तिशाली भूकंपामुळे अनेक लोकांचा बळी गेल्यानंतर पंतप्रधानांनी शॉक व्यक्त केला आहे. तसेच बचाव कार्य वेगाने राबवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यात गोठवणारी थंडी आणि मुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आल्याने ही मोहीम अधिक वेगाने राबवली जात आहे. बचाव पथकाने एका श्वनाच्या मदतीने ढिगाऱ्याखली अडकलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….