यवतमाळ : आज ९ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझेटिव्ह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १६ वर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण वाढीचा वेग मंदावला होता. एवढेच नाही तर १०१ पैकी ९४ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरीसुध्दा गेले. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या कालपर्यंत (दि.१९) सात वर आली होती. मात्र बुधवारी म्हणजेच आज (दि.२०) ला ९ जणांचा रिपोर्ट नव्याने पॉझेटिव्ह आल्याने आता जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १६ वर पोहचली आहे.
नव्याने पॉझेटिव्ह आलेले हे ९ रुग्ण पुसद येथील पॉझेटिव्ह रुग्णाच्या अगदी निकटच्या (हाय रिस्क काँटॅक्ट) संपर्कातील असून यापैकी चार दिग्रस, चार पुसद आणि एक जण महागाव तालुक्यातील आहे. सद्यस्थितीत ते संस्थात्मक विलगीकरणांतर्गत कोव्हिड केअर सेंटर येथे भरती आहेत. पुसद येथील सुरवातीच्या पॉझेटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एकूण १७ लोकांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले होते. यापैकी ९ पॉझेटिव्ह, ६ निगेटिव्ह आणि २ रिपोर्ट अप्राप्त आहे.
तसेच मंगळवारी हुडी (ता.पुसद) येथील मृत्यु झालेल्या 55 वर्षीय गौतम कांबळे यांचे नमुने तपासणीकरीता पाठवले असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. सुरवातीपासून आतापर्यंत शासकीय महाविद्यालयाने एकूण १८४७ नमुने तपासणीकरीता पाठविले. यापैकी आतापर्यंत ११० पॉझेटिव्ह, १७१६ निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले तर २१ रिपोर्ट अप्राप्त आहेत. संस्थात्मक विलगीकरणात १४ जण आणि गृह विलगीकरणात ५८१ जण आहेत.

कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढल्याने तालुक्यातील तसेच ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी. शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे. कुठेही गर्दी करू नये. अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नये. घरातच सुरक्षित रहावे. बाहेर पडल्यास मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या आदेशाचे काटेकारपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..