बारामती, शिरूर, सातारा, रायगड व्यतिरिक्त अजित पवार यांना कोणत्या जागा मिळणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) लढणार आहे. तशा प्रकारची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
या व्यतिरिक्त आणखी 3 ते 4 जागा भाजप सोडणार असल्याची चर्चा आहे. त्या नेमक्या कोणत्या जागा असतील, याची उत्सूकता लागली आहे.
सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे, शिरूरमध्ये डॉ. आमोल कोल्हे, सातारा श्रीनिवास पाटील, तर रायगड मतदारसंघात सुनील तटकरे प्रतिनिधित्व करीत आहेत. यातील 3 लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाचे खासदार आहेत.
सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखा दुसरा पर्यायी चेहरा नसल्याचे अजित पवार यांचे म्हणणे आहे.
त्यामुळेच त्यांनी शरद पवार यांची साथ सोडल्याची कुजबुज आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार आपले उमेदवार उभे (Ajit Pawar) करणार आहे. बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात भाजपने अनेकदा प्रयत्न करूनही त्यांना सुप्रिया सुळे यांचा पराभव करता आला नाही.
यावेळी मात्र खुद्द अजित पवारच उमेदवार ठरवून विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तर, दुसरीकडे शिरूर मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करणार म्हणजे करणारच, अशा प्रकारची खूणगाठ अजित पवार यांनी बांधली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..