ढाणकी येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ कार्यकारणी गठित ; अध्यक्षपदी निलेश पिलवंड तर उपाध्यक्षपदी दिगंबर शिरडकर यांची बिनविरोध निवड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ढाणकी :- महाराष्ट्र राज्यातील पत्रकार यांच्या हक्क अधिकारासाठी नेहमी कार्यदक्ष असलेल्या पत्रकार संघटना म्हणून नावलोकीक असलेल्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ यांची आज दिनांक ०१ जानेवारी रोजी ढाणकी येथे नूतन वर्षासाठी कार्यकारणी गठित करण्यात आली आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगाव व विदर्भ अध्यक्ष केशव सावळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत ढाणकी येथील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी निलेश पिलवंड तर उपाध्यक्षपदी दिगंबर शिरडकर तसेच सचिव पदी मैहबुब शेख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली असून खालील कार्यकारणी मध्ये सहसचिव पदी मोणुदिन सोदागर,सल्लागार पदी कमलाकर दुलेवाड,कोषाध्यक्ष पदी संदेश कांबळे,संघटक पदी प्रविण जोशी तर सहसंघटक पदी शेख रमजान यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच सदर कार्यकारणी मधी सदस्य म्हणून अशोक गायकवाड,तेजस तुपेकर, बंटी फुळकोंडवार,ऋषिकेश कोंडेवाड,रवी डोंगे,विलास अडागळे,संतोष पांडे,संदीप वायकोले,ऋषिकेश नफते,संदीप वाघमारे, उत्तम सोनुने,अजीस खान कदिर खान इत्यादी पत्रकार बांधव सदस्य कार्यकारणी गठित करते वेळीस उपस्थित होते.
सदर निवडही प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ यांच्या विचारांशी निगडित राहून समाजहिताचे कार्य करेल पत्रकारांच्या हक्क व अधिकारासाठी सातत्याने पुढाकार घेण्यात येईल असे विचार निलेश पिलवंड यांनी अध्यक्षपदी निवड करते वेळीस व्यक्त केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..