नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईवर बॉम्बस्फोटाचे सावट…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान मुंबईवर बॉम्बस्फोटाचे सावट आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील अनेक ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे मुंबई हाय अलर्टवर आहे.
नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान शनिवारी (दि.३०) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तिचा फोन आला. त्याने शहरात अनेक ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देत, बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले असून, मुंबईतील पोलिस आणि तपास यंत्रणा हाय अलर्टवर आहे.
पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की कॉलनंतर अनेक तपासण्या करण्यात आल्या. मात्र, काहीही संशयास्पद आढळले नाही. पोलिस फोन करणाऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान नववर्षाचे सेलिब्रेशन लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला आहे, असेही वृत्तात म्हटले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..