विदेशातून आलेले आठ नागरिक यवतमाळात क्वारंटाईन तर काही जण पुसद व दिग्रसचे
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विविध उद्देशाने लंडन, फिलीपाईन्स येथे राहणारे आठ नागरिक लॉकडाऊनमुळे आपल्या गावी यवतमाळ जिल्ह्यात परतले. त्यांना यवतमाळातील एका हॉटेलमध्ये १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यात दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे.
क्वारंटाईन केलेल्या या आठ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. परंतु त्यांच्यात कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळून आली नाही. त्यामुळे त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले जाणार नसल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले. या आठ जणांपैकी सहा जण लंडन येथे वास्तव्याला होते तर दोन विद्यार्थिनी फिलीपाईन्समधील मनिला येथे शिक्षणानिमित्ताने गेल्या होत्या. या आठ जणांमध्ये काही जण दिग्रस, पुसद तालुक्यातील असल्याचे सांगण्यात आले.केंद्र शासनाने विदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी वंदे भारत उपक्रमांतर्गत खास विमानसेवा सुरू केली होती. या विमानाद्वारे यवतमाळ जिल्ह्यातील हे आठ जण बुधवार १३ मे रोजी येथे दाखल झाले. त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. १४ दिवसानंतर पुन्हा आरोग्य तपासणी करून त्यांना जिल्ह्यातील आपल्या गावी रवाना केले जाणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..