राष्ट्रवादीची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात ; शरद पवारांनंतर अजितदादांचीही याचिका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद थेट निवडणूक आयोगात गेला असून, यावर पहिली सुनावणी शुक्रवारी झाली. यानंतर सोमवारी पुन्हा निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे.
मात्र, आयोगातील सुनावणी आधीच शरद पवारांनी मोठी खेळी खेळत थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
यानंतर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडूनही सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल करण्यात आली आहे. तसेच आमचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर कारवाई करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना द्याव्यात, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली. या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे, पण या आधीच अजित पवार गटानेही न्यायालयात धाव घेत ‘कॅव्हेट’ दाखल केल्यामुळे राष्ट्रवादीची कायदेशीर लढाई आता सर्वोच्च न्यायालयातही सुरू झाली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हाच्या वादावर शुक्रवारी निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली. या सुनावणीत दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या वेळी पक्षाध्यक्ष शरद पवार हे स्वतः उपस्थित होते. आता सोमवारी होणाऱ्या सुनावणीत काय फैसला होतो, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे, तर दुसरीकडे दोन्ही गटांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारीच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या दोन्ही सुनावणीकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….